मुबंई पूणे जुन्या महामार्गावर कंटेनर ने मेंढ्या चिरडल्या,चार मेंढ्याचा जागीच मृत्यू ,तर मेंढपाळ महिलेसह पाच मेंढ्या गंभीर जखमी..
खोपोली- दत्तात्रय शेडगे मुबंई पुणे जुन्या महामार्गावर कलोतो गावाजवळ एका कंटेनर ने मेंढ्याना जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात चार मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला तर एका महिला मेंढपाळ महिलेसह पाच मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
जुन्या मुबंई पुणे महामार्गाने पनवेल हुन खोपोली कडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनर हा खालापूर हद्दीत कलोते गावाजवळ आला असता त्याचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या मेंढ्याच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने चार मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात चार मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला तर एक मेंढपाल महिला व पाच मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत,जखमी मेंढपाळ महिलेला जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.