Sunday, September 24, 2023
Homeपुणेमुळशीमुळशी तालुक्यातील निंदनीय घटना,70 वर्षीय नराधमाचा 9 वर्ष्याच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, नराधमास...

मुळशी तालुक्यातील निंदनीय घटना,70 वर्षीय नराधमाचा 9 वर्ष्याच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, नराधमास अटक..

मुळशी (प्रतिनिधी):पौड पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना घडली आहे. ओळखीचा फायदा घेत एका 70 वर्षाच्या वृद्धाने तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीचे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून नराधमाला बेडया ठोकण्यात आल्या आहेत.
अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या या नराधमा विरोधात संपूर्ण मुळशी तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. या भयानक घटनेचा मुळशी तालुक्यातील विविध पक्ष, संघटना यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित मुलगी हे दोन्ही एकाच गावातील आहेत.पीडित मुलगी ही इयत्ता तिसरीत शिकत आहे.आरोपी त्यांच्या घराशेजारी राहत असून त्याची मुले पुण्यात राहत असल्याने तो घरी एकटाच राहतो.आरोपीने पीडित मुलीला गोड बोलत चॉकलेट व खाऊच्या पदार्थाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.या घटनेचा पुढील तपास पौड पोलीस करत आहेत.
- Advertisment -