Sunday, April 14, 2024
Homeपुणेलोणावळामुळशी देवघर येथून लोणावळ्यातील 73 वर्षीय जेष्ठ नागरिक बेपत्ता,पोलीस व नातेवाईकांकडून शोध...

मुळशी देवघर येथून लोणावळ्यातील 73 वर्षीय जेष्ठ नागरिक बेपत्ता,पोलीस व नातेवाईकांकडून शोध सुरु…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा येथील न्यू तुंगार्ली इंदिरानगर येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक दत्तू मारुती आढाव (वय 73 वर्ष) हे दि.16 फेब्रुवारी रोजी मुळशी तालुक्यातील देवघर गावातून बेपत्ता झाले आहेत.
देवघर येथे त्यांच्या नातवाच्या घरी देवाच्या कार्यक्रमासाठी ते गेले होते. 17 फेब्रुवारी रोजी देवाचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 11 वाजता ते गावात फिरायला जातो असे सांगून निघून गेले होते.मात्र दुपारपर्यंत घरी परत आले नाहीत. घरातील व्यक्तींनी त्यांचा गावात मंदिरात व सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.
ते कुठेच सापडत नसल्यामुळे त्यांचे नातू अविनाश वामन राऊत (वय 24, रा. देवघर, मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे. पोलीस व नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत.तरी आजोबा दत्तू मारुती आढाव हे कुठेही आढळ्यास तात्काळ खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा. त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. त्यांच्या अंगावर क्रिम रंगाचा शर्ट, पांढरा पायजामा व डोक्यावर टोपी आहे. त्यांची उंची 5 फुट व रंग सावळा आहे. या प्रकरणी पौड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार शिंदे हे तपास करत आहेत. वरील वर्णनाच्या आजोबा विषयी कोणास माहिती असल्यास अथवा कोणास कोठे आढळल्यास 8263026138/ 9518381816/7385856004 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page