Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळामेरिटस रिसॉर्ट तुंगार्ली लोणावळा येथून 57 वर्षीय जेष्ठ नागरिक बेपत्ता…

मेरिटस रिसॉर्ट तुंगार्ली लोणावळा येथून 57 वर्षीय जेष्ठ नागरिक बेपत्ता…

लोणावळा (प्रतिनिधी):तुंगार्ली लोणावळा येथील मेरिटस रिसॉर्ट येथून 57 वर्षीय जेष्ठ नागरिक बेपत्ता झाले.ते दि 2 मार्च रोजी सायंकाळी 5:00 वा. च्या सुमारास मेरिटस रिसॉर्ट येथून बेपत्ता झाल्याची तक्रार दि.3 रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली.
लाखन सिंग जगतसिंग बुंदेला (वय वर्ष 57, रा. गाव रंगवाना, छतरपूर, मध्य प्रदेश ) असे बेपत्ता झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा दुष्यंतसिंग लाखनसिंग बुंदेला यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार हरवलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव व वर्णन पुढील प्रमाणे आहे. नाव लाखन सिंग जगतसिंग बुंदेला वय- 57 वर्षे, रंग- सावळा, उंची 5 फुट,बांधा सडपातऴ, केस पांढरे, नाक सरऴ, अंगात पिवऴे रंगाचा फुल बाहयाचा शर्ट, काऴे रंगाची पॅन्ट,बोली भाषा- हिंदी, बुंदेली असे आहे.
याबाबत फिर्यादी यांनी खबर दिली की, त्यांचे वडील लाखन सिंग जगतसिंग बुंदेला वय- 57 वर्षे हे कोणास काही एक न सांगता मेरिटस रिसॉर्ट तुंगार्ली लोणावळा येथून निघुन गेले आहे. खबर देणार यांनी त्यांचा आज रोजी पर्यंत आजुबाजुचे परिसरात शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. तरी त्यांचा शोध व्हावा. सदर फिर्यादे वरुन मिंसींग दाखल करुन मिंसींगचा पुढिल तपास पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार उंडे हे पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page