Friday, July 26, 2024
Homeक्राईममोठे वेणगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आंब्रे याची अज्ञातांकडून निर्घृण हत्या !

मोठे वेणगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आंब्रे याची अज्ञातांकडून निर्घृण हत्या !

कर्जत पोलीसांना आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) -मुंबई – पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत तालुका गुन्हेगारी बाबत अनेक महिन्यांपासून सावरला असताना रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी वर्ष संपण्याच्या अखेरीस हादरला असून कर्जत पोलीस ठाण्याच्या ३ कि मी अंतरावर असलेल्या मोठे वेणगाव येथे रहाणाऱ्या कुणाल उर्फ रॉनी आंब्रे या २८ वर्षीय तरुणाची अज्ञातांकडून रात्रीच्या वेळी निर्घृण हत्या करण्यात आली . या घटनेमुळे कर्जत तालुका हादरला असून याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेमुळे पोलीसांना आरोपी शोधणे , हे एक मोठे आव्हान असून कर्जत पोलीसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे . या खुनाचे धागेदोरे गावातच आहेत की , अजून कुठे याचा उलगडा सध्यातरी गुलदस्त्यात बंद आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आंब्रे या २८ वर्षीय तरुणाची हत्या अज्ञातांकडून करण्यात आली आहे. आज दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी गावाच्या बाहेरील श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुणाल उर्फ रॉनी याचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ कर्जत पोलीसांना पाचारण करण्यात आले.

कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड तसेच नेरळ पोलीस अधिकारी हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. मृतदेहाची त्यांनी पाहणी केली असता रॉनी याला दगडाने ठेचून, लोखंडी सळईच्या सहाय्याने डोक्यावर आघात केल्याने त्याचा मृत्यू झाला असेल , असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मात्र रात्रीच्या वेळी या बाजूला रॉनी का गेला असेल ? जर गेला असेल तर त्याच्या सोबत कोण होते ? कोणी विश्वासू असतील का ? त्याच्यावर हल्ला त्या ठिकाणीच झाला की अजून कुठे झाला ? त्याची हत्या करण्याचा कुणाचा प्लॅन होता का ? याबाबतीत कुणाची दुष्मनी होती का ? दगडाने ठेचे पर्यंत अशी कुणाची दुष्मनी होती का ? कुणाची पैशाची देवाण घेवाण होती का ? की अजून काय हे प्रकरण आहे ? याचा उलगडा शोधणे पोलीसांसमोर मोठे आव्हान असून कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page