Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमोठ्या वेणगाव मधील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना व आरपीआय ला रामराम ठोकून राष्ट्रवादी...

मोठ्या वेणगाव मधील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना व आरपीआय ला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

सुधाकरशेठ घारे यांच्या वाढदिवशी अनोखी भेट.

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील बीड जिल्हा परिषद मतदार संघ हा राजिप चे उपाध्यक्ष तथा आरोग्य – शिक्षण – क्रीडा सभापती सुधाकरशेठ घारे यांचा मतदार संघ.या मतदार संघातील वेणगाव पंचायत समिती विभागातील वेणगाव येथील असंख्य शिवसेना व आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली व तरुणांचे आधारस्तंभ सुधाकरशेठ घारे यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

काल दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी राजिप उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे यांचा वाढदिवस होता . यानिमित्ताने पक्षप्रवेश करून त्यांना अनोखी भेट दिल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या विभागात पारडे जड झाले असून शिवसेना व आरपीआय ( आठवले गट ) ला जबरदस्त धक्का बसला आहे.चार महिन्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका व त्यानंतर येणाऱ्या वेणगाव ग्रामपंचायत निवडणुका या या परिसरात नेहमीच प्रतिष्ठेची ठरत असते.

रायगड उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांची पकड असलेली हि ग्रामपंचायत असल्याने या पक्षप्रवेशाकडे व भविष्यात होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असते.यावेळी सुभाषचंद्र गवळे – ( माजी समाज कल्याण सभापती ,रायगड जिल्हा परिषद तथा आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष )
हरिश्चंद्र गणपत गायकवाड – तालुका अध्यक्ष चर्मकार संघटना – कर्जत – शिवसेना , उत्तम सोनवणे – माजी उपसरपंच वेणगाव – शिवसेना , उत्तम जाधव , विजय गायकवाड , विश्वास भालेराव , ईश्वर भालेराव , चंद्रकांत जाधव , अनिल गवळे , विनोद भालेराव , सचिन जाधव , गणेश जाधव , प्रफुल गवळी – सदस्य ग्रामपंचायत वेणगाव , अमोल ढोले , अभि शिंदे , प्रल्हाद रातांबे , सुनील गवळे , राजू गवळे , प्रमोद गवळे ,

सुदाम गवळे , बाळाराम गवळे, सागर पंडित , जितू साबळे , विजय जाधव , जनार्दन ढेकणे , आत्माराम पाटील , संजय गवळे , सुभाष जाधव – बौद्ध महासंघ सचिव ,प्रकाश सोनवणे , गौतम सोनवणे ,आनंद सोनवणे , आकाश जाधव , प्रभाकर जाधव , प्रदीप सोनवणे , चंद्रकांत गायकवाड , सुभाष फाळे , विलास फाळे , आदर्श सोनवणे , संदेश सोनवणे , रत्नदीप गवळे , प्रभाकर सोनवणे , सदाशिव रातांबे , भगवान जाधव , रविंद्र सोनवणे , विशाल सोनवणे , सागर सोनवणे , निरज जाधव , हरिश्चंद्र सोनवणे , समाधान सोनवणे , राज सोनवणे , प्रफुल जाधव , सनी सोनवणे , सुनील सोनवणे , गणपत साबळे , महेंद्र साबळे , शशिकांत जाधव , रोशन गायकवाड , केतन रातांबे , शेरू शेख विष्णू पंडित , दीपक पंडित आदींनी पक्षप्रवेश केला . त्यामुळे शिवसेना व आरपीआय पक्षाला मोठे खिंडार पडले आहे .यावेळी राजिप उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते तानाजी चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव , पालिकेचे विरोधीपक्ष नेते शरद भाऊ लाड व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page