मोफत सातबारा वाटपाला कार्ला मळवळीतील शेकडो नागरिकांचा प्रतिसाद…

0
147

कार्ला प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महसूल विभागाने सर्व शेतकऱ्यांना मोफत डिजिटल “सात बारा “वाटप करण्यासाठी विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे.

त्याअंतर्गत आज गांधी जयंतीचे औचित्य साधत आज कार्ला व मळवली परिसरातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना “सात बारा” दुरुस्थी साठी स्वतंत्र व्यवस्था करून डिजिटल सातबारा मोफत वाटप करण्यात येत असून कार्ला मंडल मधील दीडशे शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. शासनामार्फत मोफत मिळत असलेल्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तलाठी मिरा बोऱ्हाडे यांनी केले आहे.

या यावेळी कार्ला गावच्या सरपंच दिपाली हुलावळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, पोलीस पाटील संजय जाधव, सुनील शिर्के, शिवाजी म्हाळस्कर, शुभम मावकर समवेत इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.