Saturday, July 27, 2024
Homeपुणेवडगावमोरया प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्री निमित्त वडगांव महादेव मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप…

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्री निमित्त वडगांव महादेव मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप…

मावळ(प्रतिनिधी):वडगाव शहरात महाशिवरात्रीचे औचित्य साधून शहर परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरांच्या आवारात आज सकाळी आठ ते अकरा या वेळेत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळ पासूनच नागरिकांकडून महादेवाच्या पिंडीस दुधाचा अभिषेक करण्यात येत होता. यावेळी महादेवाच्या पिंडीस नैवेद्य दाखवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी साबुदाणा खिचडी, केळी आणि राजगिरा लाडूचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. वडगाव परिसरातील बहुसंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. तर काही भाविकांनी महाप्रसाद भेटही दिला. महाशिवरात्रीनिमित्त मंदीरात भाविकांची मोठ्या प्रमाणात रीघ दिसून येत होती
यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्यासह यशवंत शिंदे, हर्षद ढोरे, प्रसाद साबळे, सुशिल कदम आदींनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page