Saturday, September 21, 2024
Homeपुणेवडगावमोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावातील दहावी बारावी च्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार…

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावातील दहावी बारावी च्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार…

वडगांव (प्रतिनिधी) :मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शैक्षणिक कालावधीत आयुष्याच्या महत्वाच्या परीक्षांपैकी सर्वात महत्वाची पहिली परीक्षा असते ती 10 वी व 12 वी ची.कारण दहावीनंतर खऱ्या स्पर्धात्मक युगाला सुरुवात होते. प्रत्येक पावलागणिक कोणीतरी आपल्याला मागे टाकण्यासाठी सज्ज असते. आपल्याला आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वांच्या पुढे जायचे असते. या सर्व स्पर्धा परिक्षांना खिलाडू वृत्तीने सामोरे जात असताना येणारी खरी मजा दहावीनंतर सुरू होते.
यावर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत इयत्ता दहावी व बारावी मध्ये इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शिवप्रतिमा देऊन गौरविण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तर यापुढील काळातसुद्धा आपण सर्वजण उत्कृष्ठ कामगिरी करत आपले पालक, शिक्षक, शाळा आणि आपल्या वडगाव शहराचे नाव अभिमानाने उंचावाल अशी अपेक्षा अबोली ढोरे यांनी व्यक्त केली.तसेच मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या मे महिन्यात वडगाव शहरातील माळीनगर, पंचमुखी मारुती मंदिर परिसर व केशवनगर या भागात महिला भगिनींसाठी आरी वर्क प्रशिक्षण घेण्यात आले होते.
हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल यावेळी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील महिला भगिनींनी स्वावलंबी होण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लागावा म्हणून आरी वर्क प्रशिक्षण राबविण्यात आले होते. येणाऱ्या कालावधीत महिला भगिनींना स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या खूप साऱ्या महिला भगिनी नक्कीच स्वता:चा व्यवसाय सुरू करतील अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, उपाध्यक्षा चेतना ढोरे, प्रतिक्षा गट, जयश्री जेरतागी, सुषमा जाजू, संगीता दौंडकर, कविता नखाते, प्रतिभा ढोरे, कांचन ढमाले, सुरेखा गुरव, रुपाली आंब्रुळे, सोनाली वाडेकर, सायली ढोरे, सारिका धुमाळ, माया पुकळे, कविता बल्लारी, दिपाली येवले आणि विद्यार्थी, पालक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page