Thursday, September 28, 2023
Homeपुणेवडगावमोरया महिला प्रतिष्ठान वडगाव ऑनलाईन मेहंदी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...

मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव ऑनलाईन मेहंदी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

वडगाव मावळ : नागपंचमी सणानिमित्त वडगाव शहरात मोरया महिला प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ऑनलाईन मेहंदी स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपात पारितोषिक, भेटवस्तू आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी व महिला भगिनींना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सर्व महिला भगिनींनी उत्साही वातावरणात स्पर्धा पार पाडत ऑनलाईन लाईव्ह स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेत विजय प्राप्त केला. त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी अभिनंदन करत स्पर्धेतील सर्वच स्पर्धक विजयी आहेत पंरतु निकाल हि त्यातील एक प्रक्रिया असते असे प्रतिपादन मयुर ढोरे यांनी केले.

तसेच आपल्या या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असेही ते म्हणाले.या पारितोषिक वितरण समारंभास नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतनाताई ढोरे, नगरसेविका पूनमताई जाधव आणि संचालक मंडळ उपस्थित होते.उपस्थितांच्या वतीने ऑनलाईन लाईव्ह मेहंदी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थी व महिला भगिनींचे मनःपूर्व अभिनंदन करण्यात आले.

- Advertisment -