Friday, February 23, 2024
Homeपुणेतळेगावमोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांचा रूट मार्च…

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांचा रूट मार्च…

मावळ (प्रतिनिधी):मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दि.28 रोजी सायंकाळी पाच ते सव्वा सहा वाजेपर्यंत तळेगाव दाभाडेमध्ये रूट मार्च घेण्यात आला.
मारुती मंदिर चौक येथून रूट मार्च सुरु करून तेली आळी चौक,राजेंद्र चौक, जामा मस्जिद, गणपती चौक, शाळा चौक, सुभाष चौक, जिजामाता चौक,ते मारुती मंदिर चौक या ठिकाणापर्यंत रूट मार्च घेण्यात आला.
सदरच्या रूट मार्च करिता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या समवेत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन कडील, 1 वपोनि, 3 सपोनि/पोसई अधिकारी व 15 अंमलदार व एस आर पी एफ चे 25 अंमलदार सहभागी होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page