Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमोहिली गावाचा सुपुत्र कु.राज गोविंद घरत भारतीय सैन्य दलात !

मोहिली गावाचा सुपुत्र कु.राज गोविंद घरत भारतीय सैन्य दलात !

कर्जत- मोहिली / हेमंत घरत – मनात ध्येय गाठण्याची जिद्द असेल व योग्य मार्गदर्शनाची साथ असेल तर तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकता . ” देवा अकॅडमीचे ” योग्य मार्गदर्शन मिळाल्याने कर्जत तालुक्यातील मोहिली येथील कु. राज गोविंद घरत या तरुणाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर अथक परिश्रम करून भारतीय सैन्य दलात यशस्वी होऊन आपले व आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार केले . या त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होऊन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अग्निविर मैदानी हि परीक्षा दि. ६ ऑक्टोंबर २०२२ रोजी ए.पी.जे.अब्दुल कलाम स्टेडियम – मुंब्रा ( जि.ठाणे ) येथे मैदानी चाचणी रात्री २ – ३० वाजता पार पडली. या मैदानी चाचणी धावण्याच्या परिक्षेत १६०० मीटर अंतर ४ . ४३ मिनिटात पार करत उत्तीर्ण झाला.तर मेडिकल दि . ७ ऑक्टोंबर २०२२ रोजी झाली , व मुंब्रा येथे १३ नोव्हेंबर २०२२ रोजी अग्णिविर मध्ये शारीरिक चाचणी पास झालेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा (written test ) घेण्यात आली. यांत हि राज घरत उत्तीर्ण झाला.
राज घरत याचे भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न साकार करण्यास ” देवा अकॅडमी ” चे संचालक व सर्वेसर्वा श्री.देविदास दत्तू चव्हाण ( मुंबई पोलीस) यांचे वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आज भारतीय सैन्य दलात (indan army ) निवड झाली , असे त्याने सांगितले.” देवा अकॅडमी ” मधील अजय शिर्के,अजय घारे , सुनील शिर्के, योगेश शिर्के, संदीप कोंडे, योगेश घोलप, विनोद येवले, किरण पाटेकर , समीर धनावडे, पुंडलिक शिर्के, मंगेश शेलके, गणेश ठाणगे, विनोद कोंडीलकर दिनेश बदे , रोशन दाभणे , शुभम शिर्के, समीर शिर्के , सागर देशमुख , कैलास तेलवणे , यांचे देवा अकॅडमी सुरू होण्यास व सराव परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य झाले.
राज घरत यांची भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने सर्व क्षेत्रातील मान्यवराकडून तसेच कुटुंबातील सदस्य , मित्र परिवार यांकडून त्याचे अभिनंदन होत आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page