Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमोहोपाडा तलावात एकोणीस वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू तर नढाल धरणातही बावीस वर्षीय...

मोहोपाडा तलावात एकोणीस वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू तर नढाल धरणातही बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू..

(खालापूर दत्तात्रय शेडगे)
खालापूर वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील नढाल पलस धरणाच्या पाण्यात बावीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर मोहोपाडा तलावातही एकोणिस वर्षीय यूवक बुडाला असून त्याला मंगलवार दि.१३ रोजी पाच वाजता पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.


नढाल पलस धरणावर पिकनिक करण्यासाठी आलेल्या पिंपरी परीसरातील राहणाऱ्या सागर अंबरे (वय २२)याला त्याच्या सोबतच्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला.पण त्याला वाचविणे शक्य झाले नाही.तर मोहोपाडा येथील तलावात पोहण्यास गेलेला राकेशकुमार (वय १९)या युवक तलावामध्यभागातील कारंजा पर्यंत गेला असताना पुन्हा परतत असताना पोहताना दम लागल्याने बुडाला असुन त्याचा मृतदेह २४ तासानंतर पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.

रसायनी पोलिसांच्या व वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या मदतीने तलावाबाहेर काढण्यात आला.यावेली मोहोपाडा तलावावर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी,रसायनी पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, गुरुनाथ साठेलकर ग्रुप यांनी भेट दिली आहे.

मोहोपाडा तलावाचा खोल भाग चिखल युक्त असून त्यात जलपर्णीं आहे.रसायनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांपुर्वी कुर्ल्यातील तिघांचा पाली भुतिवली धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पलस धरणात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या खोलीचा अंदाज नसणा-या जलाशयात पोहोण्यास उतरण्याचे धाडस पर्यटक आणि विशेषत तरुणांनी करु नये.असे आवाहन रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page