
मावळ: तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडल्यानंतर हिंसाचार उफाळला. वाहनांखाली चिरडलेल्या चार शेतकऱ्यांसह या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला.
त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. आशीष मिश्राच्या ३ दिशाभूल करणाऱ्या जबाबांनंतर एसआयटीने त्याला अटक केलं. आरोपी चौकशीत सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हिंसाचारानंतर ५ दिवसांनी आशीष मिश्राला अटक झालीय. याआधी त्याला दोनदा समन्स पाठवण्यात आलं होतं. पहिल्या वेळी तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. दुसऱ्यांदा तो चौकशीला हजर राहिला.
या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र सरकारच्या महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पुर्ण ताकदीनिशी सहभागी होत आहे. पुणे जिल्हा अध्यक्ष विकासदादा साळवे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण व संपुर्ण पुणे जिल्ह्याच्या वतीने या बंदला जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.