Sunday, December 8, 2024
Homeपुणेमावळयंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने पार पाडणार.... पवना नगर ग्रामस्थ.

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने पार पाडणार…. पवना नगर ग्रामस्थ.

(पवना प्रतिनिधी )
पवना नगर : दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशाच्या आगमनाची नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आज त्याच मंगलमूर्ती विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले.

एक प्रभाग एक गणपती ह्या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पवना नगर, काले कॉलनी, ब्राह्मणोली, येळसे, कोथुर्णे, महागाव प्रमाणे भागातील सर्व गावांमध्ये अगदी साध्या पद्धतीने गणरायाचे आगमन झाले, त्यावेळी कुठल्याही प्रकारची मिरवणूक नकाढता, ढोल ताशाचा घणघणाट नाही व कोणत्याही प्रकारची गर्दी होईल असा जल्लोष नकरता असेल त्या वाहनातून गणरायाला नेऊन घरोघरी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

त्यावेळी घरातील महिला, जेष्ठ नागरिक व लहानांनी गणपती बाप्पा मोरया…. मंगलमूर्ती मोरया,,,,, अशा घोषणा देत गणरायाची आरती करून मोठया उत्सहाने गणरायाचे स्वागत केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनाने परिसरातील व घरातील वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले आहे. यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने, शांततेत साजरा करण्यासाठी सहकार्य करू असे मत पवना नगर येथील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले. गणरायाच्या आगमनाने कोरोनाचे सावट दूर होउदे अशी प्रार्थना भाविकांकडून गणराया चरणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page