Friday, June 9, 2023
Homeपुणेयंदाचा "महाराष्ट्र केसरी" खिताब पुण्याच्या शिवराज राक्षे याने पटकाविला…

यंदाचा “महाराष्ट्र केसरी” खिताब पुण्याच्या शिवराज राक्षे याने पटकाविला…

पुणे (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी अखेर मिळाला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब शिवराज राक्षे याने आपल्या नावावर केला आहे.
पुण्यातील मामासाहेब मोहळ मैदानावर आज 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या फायनलचा थरार पाहायला मिळाला. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता . अनेक चुरशीच्या लढती आतापर्यंत पहायला मिळाल्या.
आज झालेली अंतिम लढत देखील अत्यंत चुरशीची झाल्याची पाहायला मिळाली. मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या स्पर्धेचा आज अखेर महाराष्ट्र केसरीचा मानकरी मिळाला आहे. या गदेचा मानकरी कोण ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
माती विभागातून सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात सेमीफायनलची कुस्ती झाली. माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली. महेंद्र यांनी सिकंदरवर मात करत सेमीफायनल जिंकली. तर मॅटवरील सेमीफायनल लढतीमध्ये हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शिवराज राक्षे अशी लढत पहायला मिळाली, त्यामध्ये शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीरवर विजय मिळवला.
आज सायंकाळी माती आणि मॅट विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात आल्या. यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत झाली. माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि मॅट विभागातील शिवराज राक्षे यांच्यात फायनल स्पर्धा झाली त्यात शिवराज राक्षेने बाजी मारत यंदाचा महाराष्ट्र केसरी हा खिताब पटकवला आहे.

You cannot copy content of this page