यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाला शासनाचे निर्बंध लागू….

0
511

22 रोजी पासून गणेशोत्सव सुरु होणार आहे,त्याच अनुषंगाने लोणावळा व खंडाळा परिसरातील गणेशोत्सव मंडळांना सूचना व मार्गदर्शन करण्याकरिता लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत, पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवी पवार, दत्तात्रय गवळी इत्यादीं बरोबर लोणावळा व खंडाळा परिसरातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य व नगरसेवक उपस्थित होते.

त्यावेळी नवनीत कॉवत आणि मनोज कुमार यादव यांनी गणेशोत्सव मंडळांनी पालन करावयाच्या सूचनांविषयी मार्गदर्शन करताना याकाळात खबरदारी कशी घ्यावी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाची अंमल बजावणी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

त्याच प्रमाणे यंदा गणेशोत्सव मंडळांनी मंडप विरहीत गणेशोत्सव, एकमूर्ती गणपती, विभागवार रचना, लाऊडस्पिकर बंदी, जाहिराती व प्रसिद्धी फ्लेक्सवर बंदी, अनेक स्वरूपातील देखाव्यांवर बंदी जेणेकरून ते पाहण्याकरिता नागरिक गर्दी करणार नाहीत, कमीत कमी लोकसंख्येतच गणपतीची पूजा व आरती करावी आणि गणपतीची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीस बंदी घालण्यात आली असून विसर्जनाकरिता मंडळातील फक्त पाच सदस्यांना मिरवणूक पास देण्यात येणार आहे आणि त्यांनीच सहभाग घ्यायचा आहे, मिरवणुकीवेळी कुठल्याही प्रकारचे स्वागत कक्ष नसतील यासारखे निर्बंध आलेले असून दि. 1सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी 3 वा. मावळा पुतळा इथून सुरु होऊन एकाच वाहनातून इंद्रायणी घाट इथे नेण्यात येईल. तरी सर्व मंडळांनी याची नोंद घ्यावी.