Thursday, September 28, 2023
Homeपुणेलोणावळायंदाच्या 31 डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागताला शासनाचे निर्बंध लागू ...

यंदाच्या 31 डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागताला शासनाचे निर्बंध लागू …

लोणावळा दि.29- दरवर्षी सर्वत्र साजरा होणारा 31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या स्वागताला यंदाच्या वर्षी शासनाच्या नियमावली लागू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने उपाय योजना अंतर्गत राज्यभारत 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 दरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने यंदाचा 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष 2021 चे स्वागत अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.आणि त्यासंदर्भात सूचना पत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर नजता घरच्या घरीच अगदी साधेपणाने साजरा करावा, 60 वर्षांवरील प्रौढ नागरिक तसेच 10 वर्षांखालील लहान मुलांनी सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर पडण्याचे टाळावे,नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करू नये, धार्मिक ठिकाणी गेल्यास सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे.

तसेच संबंधित व्यवस्थापनाने आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना कराव्यात, ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने फटाक्यांची आतिषबाजी करू नये अशा सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे त्यासाठी शासकीय मदत व पुनर्वसन, आरोग्य,पर्यावरण,वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे सूचना परिपत्रक राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -