Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडया मतदार संघावर " भगवा फडकवणार " शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीचा...

या मतदार संघावर ” भगवा फडकवणार ” शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीचा एल्गार…

” शिवालय ” मध्यवर्ती कार्यालयात महिला संवाद मेळावा संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच ” भगवा फडकवणार ” , असा एल्गार आज शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणी यांनी शिवालय येथे संपर्क कार्यालयात उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत केला . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा संपर्क प्रमुख किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाने महिला पदाधिकारी यांचा संवाद मेळावा उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत मधील शिवालय कार्यालयात आज बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला.

यावेळी माजी नगरसेविका तथा राजापूर तालुका संपर्क संघटिका समिक्षा सक्रे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक नेहा माने, माजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक तथा माजी उपसभापती पं.स.कुडाळ श्रेया परब, माजी महापौर तथा पुणे शहर संपर्क संघटक स्नेहल आंबेकर, शिवसेना रायगड जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, सुमन डोंगरे, करुणा बडेकर, साधना राऊळ, शैला भगत, वैजयंती गायकवाड, सुविधा विचारे, रंजना राणे, सुजाता मनवे, धनश्री चंदन, नीता मांडे, मीना कुलकर्णी आदी प्रमुखां बरोबरच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

यावेळी कर्जत भिसेगाव मधील महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश करत पुढील काळात पक्षाचे काम प्रामाणिकपणे करू , असे आश्वासन याप्रसंगी दिले . तर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी मोठ्या जोमाने पक्ष बांधणीवर भर देत , पक्ष संघटना मजबूत करीत असताना पुढील काळात कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ” भगवा झेंडा ” फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून , आपापसातील मतभेद बाजूला ठेवत एक दिलाने काम करून या ठिकाणी उद्धव साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी प्रामाणिक राहू , असे आश्वासन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिल्याचे पाहायला मिळाले. तर महिला आघाडीची बहुसंख्य उपस्थिती पाहता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेनेची महिला आघाडी मजबूत असल्याचे पहावयास मिळाले.

तर यावेळी भिसेगाव प्रभागातील सौ. रंजना हजारे , श्रद्धा हजारे तसेच ओलमन आदिवासी वाडी व झुगरेवाडी येथील महिलांनी ठाकरे गट शिवसेनेत पक्षप्रवेश करीत उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांना पुढील काळात ताकद देऊ , असे आश्वासित केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page