प्रतिनिधी(दत्तात्रय शेडगे)
मुळशी -युवासेना मुळशी उपतालुका अधिकारी युवा नेते गजानन गोविंद हिरवे यांची नुकतीच निवड करण्यात आली,
मुळशी तालुक्यातील युवासेनेच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातुन ह्या नियुक्त्या जाहीर केल्या मुळशी तालुक्यात शिवसेना युवासेनेचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढत असून तरुण वर्ग आकर्षित होत आहे,त्याचप्रमाणे युवासेनेचे संघटना मजबूत करण्यासाठी ह्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
युवासेना मुळशी उपतालुका अधिकारी पदी गजानन गोविंद हिरवे यांची निवड होताच त्यांना बारामती लोकसभा युवासेना विस्तारक गणेश कवडे, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, युवासेना उपजिल्हाधिकारी संतोष तोंडे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर या आधीही हिरवे यांनी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले असून मुळशी तालुक्यात युवासेनेचे पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे गजानन हिरवे यांनी सांगितले.