Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडयेणाऱ्या सर्व निवडणुका " जिंकण्यासाठी " सज्ज व्हा - सुधाकर भाऊ घारे..

येणाऱ्या सर्व निवडणुका ” जिंकण्यासाठी ” सज्ज व्हा – सुधाकर भाऊ घारे..

” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ” अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश संपन्न

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) झालेल्या निवडणुकीत माझ्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ” जीवापाड मेहनत ” घेतली असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ” ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद , नगर परिषद ” या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहून ताकदीने निवडणूक लढवून ” राष्ट्रवादीचा झेंडा ” सर्वत्र फडकवणार , असे भावनिक आश्वासन देत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा , असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राजिपचे मा. उपाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांनी शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी कर्जत येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे झालेल्या विविध कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मा. आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता , त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मा. आमदार अनिकेत भाई तटकरे , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , राजिप चे मा. समाज कल्याण सभापती नारायण डामसे , जिल्हा संघटक दिपक श्रीखंडे , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , भूषण पाटील , सुरेखा खेडकर , पंचायत समिती मा. सदस्या हिंदोळा , शरद कदम , स्वप्नील पालकर , केतन बेलोसे , भानुदास पालकर , त्याचप्रमाणे कर्जत खालापूर मतदार संघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते . यावेळी सालोख ग्रामपंचायत उपसरपंच आवेश ज्यूआरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसहित इतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
या सर्वांचे स्वागत मा. आमदार अनिकेत भाई तटकरे व सुधाकर भाऊ घारे यांनी केले . याप्रसंगी सुधाकर भाऊ घारे म्हणाले की , अनेक पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत आहेत , अपयश आले पण आम्ही खचून न जाता पुन्हा कामाला सुरुवात केली आहे . आपला एक ही कार्यकर्ता कुठे गेला नाही , सत्ता असते तिकडे पक्षात जातात , पण कुणी गेले नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले .
मागील पाच वर्षांत आम्ही आमदार नसताना देखील तटकरे साहेबांनी सर्वांची कामे केली , आपला पक्ष जनतेची नेहमीच कामे करत असतो. साळोख ग्रामपंचायती वर भविष्यात ” राष्ट्रवादीचा झेंडा ” फडकणार असे आश्वासन याप्रसंगी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले . म्हणूनच येणाऱ्या सर्व निवडणुका ” जिंकण्यासाठी ” सज्ज व्हा , असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले . आपल्या कार्यकर्त्यांना खोट्या पोलीस केस मध्ये अडकवले जात आहे पण आपला कार्यकर्ता कुठेच अडकला जाणार नाही , असे ठणकावून सांगत अन्याय होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही , कुणाच्या सांगण्यावरून जर असे होत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल , असा इशारा त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता दिला . येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देऊन ताकदीने निवडून आणू असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले . भाऊ मावळते नाहीत तर ” उगवता सूर्य ” आहे , म्हणूनच राष्ट्रवादीत अनेकांचा पक्ष प्रवेश होत आहे , असेच चित्र या पक्ष प्रवेश सोहळ्यास दिसत होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page