योग दिनाचे औचित्य साधून लोणावळा आय टी आय येथे 200 झाडे लावण्यात आली.. शिवसेवा प्रतिष्ठानचा उपक्रम..

0
103

लोणावळा दि.21: लोणावळा शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून लोणावळा शासकीय व्यवसाय प्रशिक्षण संस्था ( आय टी आय ) परिसरात 200 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.त्यावेळी व्यवसाय प्रशिक्षण संस्था व प्रादेशिक सहसंचालक अनिल गावित, संस्थेचे प्राचार्य पांडुरंग देशमाने, गटनिर्देशक पासलकर, साबळे सर सहाय्यक भंडारपाल शेखर पारटे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच शिवसेवा प्रतिष्ठान च्या वतीने सिद्धी साखळकर, महेश छत्ते,दत्ता येवले,प्रमोद देशपांडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास लोणावळा खंडाळा सिटीझन फोरम यांच्या वतीने रोपे पुरविण्यात आली तर रोपे लावण्यासाठी खड्डे घेण्यासाठी नगरसेविका आरोही तळेगावकर यांनी जे सी बी उपलब्ध करून दिला आहे.

सिटीझन फोरम यांनी रोपे उपलब्ध करून दिली तसेच नगरसेविका आरोही तळेगावकर यांच्या माध्यमातून जे सी बी उपलब्ध करून वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यात आले. सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून स्वप्नील देवकाते यांनी काम पाहिले आहे. विशेष म्हणजे लोणावळा शिवसेनवा प्रतिष्ठान यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण सारखे कार्यक्रम यापूर्वी आय टी आय परिसरात करण्यात येत असल्याने “ग्रीन आय टी आय “या संकल्पनेला उभारी मिळत आहे.