Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरविवार पासून भिसेगाव- गुंडगे परिसरात पाण्याचे वेळापत्रक बिघडले !

रविवार पासून भिसेगाव- गुंडगे परिसरात पाण्याचे वेळापत्रक बिघडले !

महिला वर्गांत संतापाची लाट…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव – गुंडगे प्रभागात रविवार दि.१६ एप्रिल पासून पाण्याचे वेळापत्रक बिघडले असून येणारे पाणी देखील कमी असल्याने महिला वर्गांत संतापाची लाट पसरली आहे . एप्रिल महिना अजून सरला नसताना आताच पाण्याचे हे हाल असतील तर पुढे मे महिन्यात काय होणार , असा संतापजनक सवाल देखील महिला वर्ग करताना दिसत आहेत.

कर्जत नगर परिषदेच्या पाणी विभागाच्या अभियंता पासून कर्मचारी पर्यंत पाण्याच्या नियोजनावर कुणाचेच अंकुश राहिले नाही , त्यामुळे प्रभागात पाणी टंचाई तर सकाळी येणारे पाणी दुपारी येत असल्याने महिला वर्गांचे दैनंदिन कामांचे देखील वेळापत्रक बदलत आहे . एखादी महिला बाजारहाट करण्यास गेल्यावर पाणी आल्यावर त्या कश्या पाणी भरणार , तर कमी प्रेशरने येत असलेले पाणी पुरेसे मिळत नसल्याने ऐन गर्मीत परिसरात संतापाचे वातावरण आहे . आज प्रभागात पाणी आले नाही , किंवा उशिरा येईल , कारण काय तर आज लाईट नव्हती , उद्या काय तर अमुक परिसरात पाणी पहिले सोडणार , म्हणून भिसेगाव येथे पाणी लेट , परवा काय तर , मेन पाईप च काम निघाले , अशी एक ना अनेक कारणे सोशल मीडियावर पाणी यंत्रणेवाले पाठवीत असल्याने , जर पालिकेच्या पाणी यंत्रणेला नागरिकांना पाणी पुरविता येत नसेल ,नागरिकांच्या हिताची कामे होत नसतील तर संबंधित मुख्याधिकारी – सभापती – पाणी अभियंता – कर्मचारी – यांच्या केबिन बंद करा , असा संतापजनक सूर महिलांमध्ये चर्चा होऊन निघत आहे.

परिसरात वाढते नागरिकीकरण व लोकसंख्येचा विचार करता वीस वर्षांपूर्वीची पाणी योजनेचे पाणी आता कसे पुरविता येईल , ? असा यक्षप्रश्न उपस्थित होत असताना वाढीव पाण्याच्या साठवण टाक्या कर्जत नगर परिषद हद्दीत वाढविणे गरजेचे असून ,या मुख्य समस्येकडेच दुर्लक्ष होताना दिसत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page