Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडरसायनीतील दिपक कांबळी पुरविणार 'प्राण'वायू स्वता:च्या अनुभवातून दुसऱ्यांचा जीव वाचविणार..

रसायनीतील दिपक कांबळी पुरविणार ‘प्राण’वायू स्वता:च्या अनुभवातून दुसऱ्यांचा जीव वाचविणार..

खालापूर (दत्तात्रय शेडगे)कोरोना या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे आणि हा विषाणू प्रामुख्याने फुप्फुसावर प्रहार करत असल्याने रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होवू लागते.व श्वासोच्छास घेण्यास त्रास होतो. अशामध्ये रुग्णांस बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा वेलीच न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.


दिपक कांबळी हे स्वता: या अनुभवातून गेल्याने त्यांच्यासारखा प्रसंग इतर कुणावरही येऊ नये. ऑक्सिजन अभावी कुणाचा मृत्यू होवू नये म्हणून सर्वंसामान्यांना ऑक्सिजन सिलेंडर अगदी मोफत देण्याचे ठरवून आपल्याला आलेला अनुभव दुस-याला येवू नये.यासाठी रसायनी,खालापूर,कर्जंत परीसरातील रुग्णांसाठी हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट होईपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर मोफत पुरविण्याची व्यवस्था मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांनी केली आहे.


गेल्यावर्षी पेक्षा यावेळची दुसरी लाट फार तीव्रतेने वाढत आहे.सर्वंत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.त्यामुले रुग्णांना मोफत ऑक्सिजन सेवा दिपक कांबळी यांनी सुरू केली असून ,ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातली खालावली आहे.त्यांना मोफत आॅक्सिजन सिलेंडर पुरविणार असल्याचे दिपक कांबळी यांनी सांगितले.दिपक कांबळी यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.विशेष म्हणजे हि सेवा चौवीस तास सुरू राहणार आहे.

यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांनी संपर्क करावा असे आवाहन दिपक कांबळी यांनी केले आहे.दरम्यान दीपक कांबळी यांनी जास्तीत जास्त ऑक्सिजन सिलेंडर जमविण्यास सुरूवात केली आहे.भविष्यात दुदैवाने कोरोनाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढले व हाॅस्पिटलमध्ये बेड मिलणे शक्य होणार नाही.

अशावेली त्यांना ऑक्सिजन घरच्याघरी उपलब्ध करून दिला तर दिपक कांबळी यांच्या संपर्कातील तज्ञ डॉक्टर हाॅस्पिटलात बेड मिळेपर्यंत मोबाईल उपचार देण्यास तयार आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई, मुंबई,ठाणे परिसरातील एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन ची गरज असल्यास तेथील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ऑक्सिजनची व्यवस्था केली जाणार असल्याचे मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष दीपक कांबळी यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी ९९२२११३३७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन दिपक कांबळी यांनी केले आहे.

- Advertisment -