Monday, April 15, 2024
Homeपुणेलोणावळारस्ता दुरुस्ती व डुकरांची विल्हेवाट लावण्याचे भाजपा अल्पसंख्यांक सेल मावळची मागणी…

रस्ता दुरुस्ती व डुकरांची विल्हेवाट लावण्याचे भाजपा अल्पसंख्यांक सेल मावळची मागणी…

लोणावळा (प्रतिनिधी):खंडाळा केळपेठ निळकंठ कंटेश्वर मंदिर ते दिलीप बनसोडे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून पाहणी करून रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीचे भाजपा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शौकत शेख यांच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
खंडाळा केळपेठ,निळकंठेश्वर मंदिर ते रहदाराची रोड आहे तो दिलीप बनसोडे यांच्या घरापर्यंतचा रहदारीचा रस्ता पुर्णपर्ण खराब झाला आहे. तेथे खुपच खडडे पडले आहेत.त्यामुळे येथे बरेच जण गाडीवरून पडून अपघात होत आहेत,तसेच या रस्त्याने येण्या जाण्यासाठी जेष्ठ नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.तसेच या रस्त्याने अपघात होऊन एखाद्याची जिवीत हाणी होण्याची दाट शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
त्याचबरोबर स्वतः येऊन या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करावे अशी विनंती मुख्याधिकारी पंडित पाटील यांना निवेदनामार्फत करण्यात आली आहे.तसेच खंडाळा तलाव परिसरात रहदारीच्या ठिकाणी डुकरांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन येथील रहिवाशीयांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे तरी यासाठी प्रशासनाने डुकरांची विल्हेवाट लावावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मावळ तालुकाध्यक्ष शौकत शेख यांच्या सह भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे सागर बेलुरे, साजिद शेख, शाहरुख शेख, रिजवान खान, बबन शिंदे, कादिर मुगल, सचिन शिंदे, अल्पेश दास, अजय गुप्ता, सुरज परदेसी, इम्तियाज सय्यद, सोहम म्हात्रे, आदिल खान, समीर शेख, रफीक अन्सारी, विनायक बोंद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page