Saturday, July 27, 2024
Homeपुणेमावळरस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालक व विध्यार्थ्यांना लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून वाहतूक नियमांबद्दल...

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालक व विध्यार्थ्यांना लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून वाहतूक नियमांबद्दल जनजागृती…

लोणावळा (प्रतिनिधी): रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वरसोली टोलनाका येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत जन जागृती करण्यात आली.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि.16 रोजी रस्ता सुरक्षा अभियान वरसोली टोल नाका येथे राबवत असताना वाहन चालकांना वाहतूक नियमांबद्दल सूचना देवून मार्गदर्शन करण्यात आले, मोटर सायकल स्वारांना हेल्मेट वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अपघात झाल्या नंतर जखमींना तत्काळ हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
त्याचबरोबर ज्या वाहतूक चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले अशा चालकांचा गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.तसेच दि.17 रोजी औंढोली येथील नागनाथ विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विद्यालयातील मुला मुलींना वाहतुक नियमांबाबत माहिती देण्यात आली.तसेच वाहतूक सुरक्षेबाबत समुदायिक शपथ ही यावेळी घेण्यात आली.
लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे भूषण कदम,विनोद गवळी, महामार्ग पोलिस सुनील दरेकर, होमगार्ड सागर कुंभार, आनंद शिर्के,अनिकेत इंगवले आदिनीं हे रस्ता सुरक्षा अभियान राबविले.
- Advertisment -

You cannot copy content of this page