Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडरस्ता सुरक्षा अभियानातर्गत बोरघाट पोलिसांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके.

रस्ता सुरक्षा अभियानातर्गत बोरघाट पोलिसांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके.


अपघात ग्रस्त कार अमृतांजन ब्रिज जवळ ठेवून केला स्तुत्य उपक्रम..

खोपोली-दत्तात्रय शेडगे

सद्य सगळीकडे रस्ता सुरक्षा अभियान मोठ्या प्रमाणात चालू आहे मात्र आज बोरघाट महामार्ग पोलिसांनी अमृतांजन ब्रिजच्या कठड्यावर प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून अपघात ग्रस्त कार, आणि मोटार सायकल ही दोन वाहने ठेवून वाहन चालकांना वाहन चालकांना व अफकोन कंपनीच्या कामागराना रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व पटवून दिले.


यावेळी नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, सीट बेल्ड लावणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, रस्त्यावर वाहन उभे करू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नये, दुचाकी वाहनवरून ट्रिपल सीट प्रवास करू नये या नियमाचे महत्व पटवुन देत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

- Advertisment -