मावळ (प्रतिनिधी) : तळेगाव दाभाडे येथे रस्त्याच्या कडेला उभे राहून वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने हावभाव करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई काल शुक्रवार दि.4 रोजी जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर करण्यात आली.
याप्रकरणी सचिन संजीवन शिंदे ( वय 29, रा . विश्रांतवाडी ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 27 आणि 35 वर्षीय दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी महिलांनी जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ गेट नं.2 समोर रस्त्याच्या कडेला थांबून वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लोकांना लैंगिक हावभाव करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केला. असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.