Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराजकीय क्षितिजावर कर्तृत्ववान चमकणारा तारा सुधाकरशेठ घारे !

राजकीय क्षितिजावर कर्तृत्ववान चमकणारा तारा सुधाकरशेठ घारे !

प्रगतशील शेतकरी ते राजिप चे उपाध्यक्ष एक सुवर्ण राजयोग…

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) राजयोग कधी येईल , तर कधी वनवास , हे सांगता येणे शक्य नाही .सुतपुत्र कर्ण राजा झाला तर पांडवाना राजा असुनही वनवासाचे जीवन जगावे लागले .सतयुग गेले , कलयुग आले ,तरीही ही परंपरा अजुनही कायमच राहिली .निसर्गाची अगाध महिमाच म्हणावे लागेल.
पण तरीही आपल्या चाणाक्ष बुद्धीने वेळेवर मात करत मेहनतीने प्रगतशील शेतकरी असताना आपल्या हातून परिसराबरोबरच तालुक्यातील गोरगरीब – गरजू शेतकरी बांधवांची सेवा व्हावी , नागरिकांच्या समस्या आपण लक्ष घालून सोडवू शकू , म्हणूनच प्रथमच बीड जिल्हा परिषद निवडणुकीस सामोरे जाऊन झालेल्या अटीतटीच्या लढतीत सन २०१७ साली राजयोग खेचून आणून विजयी झालेले रायगडचे ” भीष्मांचार्य ” सुनील तटकरे यांचे विश्वासू तर कर्जत – खालापूर मतदार संघाचे ” द्रोणाचार्य ” कार्यसम्राट माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचे खंदे शिष्य की ज्यांनी कमी वयात रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद आपल्या कार्यकुशलतेने विकासाची गंगा सर्वत्र आणून पेलले , ते तरुणांचे ताईत , अतिशय नम्र , सतत हसतमुख , कर्जत तालुक्यातील सांगवी येथे रहाणारे ” सुधाकरशेठ परशुराम घारे “कर्जत तालुक्यात वास-याच्या खोंड्यात सांगवी या ग्रामीण भागात रहाणारे सुधाकर घारे हे प्रगतशील शेतकरी कुटुंबातील आहेत.
वडील परशुराम ( आप्पा ) घारे हे राजकारणात असूनही सुधाकर घारे हे शेती व्यवसाय , पालेभाज्या , दुग्ध व्यवसाय करत उदयास येत होते . परिसरातील नागरिकांच्या , शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवत असताना खांडपे ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी उडी घेऊन त्यांचे बंधू मधुकर घारे यांना निवडून आणले व ग्रामपंचायत ताब्यात घेतली. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील इंग्रजीतून शिक्षण घेऊन आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात गरुड भरारी घ्यावी , हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात झेप घेतली व अत्याधुनिक शिक्षण असलेली शाळा उदयास आणली.आज कर्जत तालुक्यातील नावारूपास आलेली त्यांच्या स्वर्गीय पत्नी यांच्या नावाने ” गीता फाउंडेशन ” ची निर्मिती केली.

आपल्या परिसरातील ग्रामीण तरुणांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली .याच त्यांच्या स्वभावाने ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले.त्यांच्या वाढत्या कार्यकुशल प्रसिद्धीचा आलेख पाहून कर्जत – खालापूर मतदार संघाचे तत्कालीन कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ लाड यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा पारंपारीक गौरकामथ मतदार संघ व सध्याचा बीड जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांना संधी दिली व ते प्रचंड मताने निवडून आले व त्यांना सुरेशभाऊ लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगडचे सर्वेसर्वा सुनील तटकरे यांना सांगून रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण – आरोग्य – क्रीडा विभागाचे सभापती करून आपल्या तालुक्यातील विकासाचा त्यांना महामेरू केले.
कोरोना संसर्ग महामारीत त्यांची नागरिकांना केलेली मदत त्यातून त्यांची दिसणारी तळमळ हि न विसरणारीच होती . भविष्यात अजूनही त्यांच्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर व राजयोगाच्या सामर्थ्याने उत्तरोत्तर राजकीय मुसंडी कसे मारतात , हे येणारी वेळच ठरवणार असून भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे ” राजकीय वारसदार ” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने त्यांचे पुढील राजयोग सुवर्ण काळात होवो , हीच शुभेच्छा ” त्यांच्या १७ ऑक्टोबर २०२२ तारखेच्या जन्मदिनी या मतदार संघातील मतदार राजा त्यांना भविष्यासाठी देवो , हिच ईश्वरचरणी प्रार्थना !
- Advertisment -

You cannot copy content of this page