Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडराजकीय व सामाजिक क्षेत्रातील कोहिनूर हिरा, म्हणजेच सर्वांचा आप्पा, उमेश गायकवाड !

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कोहिनूर हिरा, म्हणजेच सर्वांचा आप्पा, उमेश गायकवाड !

विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी नगरसेवक उमेश गायकवाड यांचा वाढदिवस साजरा.

(भिसेगाव -सुभाष सोनावणे) कर्जत -लहानपणापासून समाज सेवेचे व्रत अंगीकारून गावातील प्रत्येक कामात ,सण -उत्सावात तसेच नागरिकांच्या अडीअडचणीला उभे राहून मदत करणारे,कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण -होतकरू माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उमेश श्रीरंग गायकवाड हे सर्वांच्याच परिचयाचे कर्जत तालुक्यातील बहुजन चळवळीत अग्रेसर असणारे गुंडगे हे डॅशिंग गाव म्हणून इतिहासातील ओळख याच गुंडगे गावात ०१ जुलै १९७२ रोजी उमेश आप्पा यांचा जन्म झाला.

गावातील अनेक कार्यक्रम व चळवळीतील आंदोलनात सहभाग घेण्याचा उमेश यांचा लहानपणापासूनच हातखंडा होता.ते सतत पुढे राहून काम करत गुंडगे गावात त्यांनी कला ,क्रीडा ,सांस्कृतिक कार्यक्रम ,सण -उत्सव , यांसारखे कार्यक्रम राबवून महिला व विद्यार्थी -विद्यार्थींनींना त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न ते कार्यक्रम राबवून आजपर्यंत करत आले आहेत.

व्यायाम शाळा स्थापन करून त्यांनी अनेक तरुणांना व्यायाम करण्याची आवड निर्माण केली.पंचक्रोशीतील तसेच गुंडगे परिसरातील कोणीही नागरिक रात्री -बेरात्री आजारी असल्यास त्यांना मदतीचा हात त्यांचा नेहमीच असतो.रुग्णालयात रुग्णास नेणे,त्यास रक्तदान करणे ,रुग्ण बरा होऊन घरी कसा येईल प्रसंगी त्याला पैशाची मदत करणे याची बारकाईने ते लक्ष ठेवतात.शांत संयमी सदा हसतमुख असा त्यांचा स्वभाव असल्याने लहानांपासून -मोठ्यापर्यंत ते “आप्पा “म्हणून परिचयाचे आहेत.

त्यांचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात आहे, तरुणाचे ते आधारस्तंभ आहेत.गावातील वरीष्ठां सोबत राजकारणात उडी घेऊन ते प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद झाले.पुढे होऊन काही मागायचे,हे त्यांच्या स्वभावात नसल्याने ते राजकारणात कुठल्याही पदावर आजपर्यंत राहिले नाहीत.

मात्र राजकीय क्षेत्रात त्यांचे काम धडाडीचे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा.शरदचंद्र पवार साहेब,कोकणचे भाग्यविधाते व खासदार सुनीलजी तटकरे,कर्जत -खालापुरचे लोकप्रिय माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते प्रत्येक निवडणुकीत मोठया हिरीरीने काम करतात.कर्जत नगर परिषदेच्या स्थापने पासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत कधीच ,”मला तिकीट पाहिजे “असे स्वताहून मागणी केली नाही.

मात्र वरिष्ठांनी सांगितलेले काम तडीस नेणे,व दिलेला उमेदवार निवडून आणून दाखविणे,हि त्यांची जिद्द ,त्यामुळे गुंडगे परिसरात विजयाचा गुलाल ते खेचून आणत .२०१४ व २०१९ साली झालेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत गुंडगे प्रभागात ते दोन वेळा विजयी झाले.याचीच दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय -लोकनेते माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी घेतली व उमेश आप्पास उपनगराध्यक्ष पदी बसविले.
नगरसेवक रुपी लोकप्रतिनिधीचा त्यांनी गावातील व प्रभागातील सर्व नागरिकांसाठी प्रचंड मेहनत घेऊन वेगवेगळ्या समितीच्या सभापती पदी राहून कामे केली.

गुंडगे परिसरातील सिमेंटचे रस्ते ,गटारे , स्मशानभूमी , शौचालय दुरुस्ती , सीसी टीव्ही कॅमेरे , सोमजाई मंदिर रस्ता , वृक्षारोपण,जेष्ठ नागरिकांना बसण्यास बाकडे,रस्त्यांवर दिवाबत्ती ,परिसरातील स्वच्छता अभियानात भाग समाज मंदिर बांधकाम असे विविध कामे करत त्यांनी आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर बनविला आहे.१० वी १२ वी विद्यार्थ्यासाठी परीक्षेपूर्वी शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम ,तसेच पास झालेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा वह्या बॅग वाटप गोरगरीब महिलांना साडी वाटप त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम पार पडत आहे.

सोमजाई माता धार्मिक उत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंतीत ते हिरीरीने भाग घेतात .त्यांच्या या समाजसेवेच्या कार्यात त्यांची आई मुक्ताई श्रीरंग गायकवाड यांचे आशिर्वाद , प्रत्येक कार्यात सावली सारखी साथ देणारी त्यांची पत्नी हर्षाली वडीलधारे भाऊ रमेशदादा ,सुरेशभाई , त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा दिवंगत गणेशदादा यांचे आशिर्वाद तसेच राजकीय मार्गदर्शन देणारे त्यांचे मामा माजी उपनगराध्यक्ष वसंत सुर्वे त्याचप्रमाणे गुंडगे प्रभागातील ग्रामस्थ ,वडीलधारी मंडळी ,सर्व गायकवाड , सुर्वे निकाळजे कुटुंब व नातेवाईक यांचा आशीर्वाद घेऊन सर्वांच्या साथीमुळेच त्यांनी एव्हढी मोठी मजल मारली हे ते प्रामाणिकपणे सांगतात.

ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो ,त्या गावाच्या विकासाठी मी उपयोगी पडलो ,याचा मला आनंद वाटतो ,व असेच प्रेम गुंडगे ग्रामस्थानीं माझ्यावर करावे ,अशी विनंती हि ते करतात,अशा मनाने दिलदार ,सर्वांसाठी मदतीचा हात देणारे ,रात्री -बेरात्री मदतीला धावून जाणारे ,सर्व धर्म समभावाची भावना जपणारे ,आदिवासी बांधवांसाठी नेहमीच तळमळीने काम करणारे ,राजकीय क्षेत्रात माजी आमदार सुरेशभाऊ लाड , माजी नगराध्यक्ष राजेशदादा लाड , जेष्ठ नगरसेवक शरदभाऊ लाड यांच्या खांद्याला -खांदा लावून काम करणारे ,सर्वांचा “आप्पा ” म्हणजे उमेशआप्पा गायकवाड यांना पुढील आयुष्य सुखाचे -समृद्धीचे -भरभराटीचे -दीर्घआयुषी -आनंददायी जावो ,अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना.

- Advertisment -