Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्रखेडराजगुरू नगर ( खेड ) येथील आर पी आय ( A )...

राजगुरू नगर ( खेड ) येथील आर पी आय ( A ) युवक शाखेचे उदघाटन…

खेड दि. १९: राजगुरू नगर(खेड) येथील खरपुडी खुर्द व बुद्रुक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक शाखेचे उदघाटन जिल्हाध्यक्ष विकास साळवे व युवक जिल्हाध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या सुचने नुसार पुणे जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांचे पक्ष वाढ व शाखा वाढी संदर्भात जिल्हास्तरीय दौरा सुरु असून जिल्हाध्यक्ष विकास साळवे व युवक जिल्हाध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्या हस्ते शाखेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी खेड युवक तालुकाध्यक्ष आकाश डोळस,जेष्ठ नेते कैलास केदारी,युवा नेते माणिक भोसले, कामशेत शहराध्यक्ष दिनेश शिंदे,युवक तालुका संघटक सचिन साळवे,तालुका युवक कोष्याध्यक्ष किशोर वंजारी,तसेच शाखेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

- Advertisment -