मुंबई:०७ जुलै रोजी दोन समाजकंटकांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची तोडफोड केली होती.यांनी राजगृहाच्या काचाही फोडल्या होत्या. त्याचबरोबर घरातील बागेची नासधूस केली होती. या प्रकरणी पंधरा दिवसानंतर तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
माटुंगा पोलिसांनी विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काल्या याला अटक केली आहे. त्याला बुधवारी कल्याण रेल्वे स्थानका बाहेरून अटक करण्यात आले आहे. राजगृहा बाहेरील परिसरात मोफत जेवण मिळत असल्याने विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काल्या. राजगृह बाहेरील फुटपाथवर राहत होता.पण त्याला घटनेच्या आदल्या दिवशी हटकले या रागामुळे त्याने असे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.
सात जुलैला सायंकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सोबत असणारर्या उमेश जाधव याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. जाधव हा परेल चा रहिवासी असून तो भिकारी काम करतो. जाधव च्या चौकशीतून तोडफोड करणारा चे नाव काल्या असल्याचे समोर आले. लॉक डाऊन दरम्यान जेवण वाटप होत असताना त्याची काल्या सोबत ओळख झाली होती.दोघेही फुटपाथवरच राहायचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस काल्या पर्यंत पोहोचले.