Monday, August 4, 2025
Homeपुणेलोणावळाराजमाची डोनेटर ग्रुपकडून आदिवासी बांधवांसाठी दिवाळी भेट देण्यात आली...

राजमाची डोनेटर ग्रुपकडून आदिवासी बांधवांसाठी दिवाळी भेट देण्यात आली…

लोणावळा (प्रतिनिधी): राजमाची डोनेटर ग्रुपच्यावतीने दीपावली सणानिमित्त राजमाची परिसरातील अतिदुर्गम परंतु निसर्गरम्य अशा वनाटी व फणसराई या आदिवासी पाड्यातील 27 कुटुंबाना लागणारे जीवनावश्यक साहित्यवाटप करण्यात आले.दर वर्षी दिवाळी सनानिमित्त राजमाची डोनेटर ग्रुपच्या वतीने आदिवासी पड्यांवरील अधिवासी कुटुंबाना दिवाळी साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असते.
सालाबादप्रमाणे राजमाची डोनेटर ग्रुपच्यावतीने अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर तांदूळ,साखर,रवा,मीठ,खोबरं,भाजके पोहे, हळद, मिरची पावडर,मैदा, गुळ, साबण,उटणे पाकीट, धूप अगरबत्ती एक पाकीट,चहा पावडर,तेल,तूर डाळ,बेसन,ज्वारी, शेंगदाणे, पणती,फळे ई.दिवाळी सनासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे वनाटी येथील अंगणवाडीच्या सोयी सुविधासाठी आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी राजमाची डोनेटर ग्रुपचे यशवंत भालेकर, मिथुन पाठारे, बाळकृष्ण बलकवडे, संदीप पाठारे, येडे पाटील,कपिल पाटील,योगेश पाटील, मयूर वाळुंज, मनोज भालेकर, योगेंद्र जाधव, प्रवीण मोरे, रमेश सावंत, संदीप बेल्हेकर, अतुल नेवासे, देवकांत बनकर, पीटर कलंके, गृहलक्ष्मी लाकडी घाणा तळवडे इत्यादींनी भाग घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page