Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण- आमदार गोपीचंद पडळकर…

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण- आमदार गोपीचंद पडळकर…

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.


महापराक्रमी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर सोहळा येत्या १६ मार्च ला होणार आहे.
श्रीक्षेत्र औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे मल्हारराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत १६ मार्च ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मेंढपाळ बांधव आणी भगिनी यांच्या हस्ते होणार आहे.
तरी या अनावरण सोहळ्याला समाज बांधवांसह भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page