राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी..

0
39

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केले त्या वेळेस उपस्थित असताना नगराध्यक्षा प्रेरणा सावंत तसेच नगसेवक,नगरसेविका पालिका कर्मचारी वृंद.

माथेरान -दत्ता शिंदे

दि.१२ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माथेरान नगरपरिषदेच्या दालनात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

माथेरान नौरोजी उद्यान येथे बेलाचे वृक्ष रोपण करताना नगराध्यक्षा प्रेरणा सावंत ,नगरसेवक चंद्रकांत जाधव नगरसेविका सोनम दाभेकर प्रतिभा घावरे

तसेच या जयंतीचे औचित्य साधत नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या शुभ हस्ते नौरोजी उद्यान येथे बेल या वृक्षाची लागवड करण्यात आली याप्रसंगी शिक्षण सभापती मा. प्रतिभा घावरे महिला व बालकल्याण सभापती मा.सोनम दाभेकर उपसभापती मा.कीर्ती मोरे, नगरसेवक चंद्रकांत जाधव, नगरसेवक संदीप कदम नगरसेवक राकेश चौधरी,नगरपरिषद कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे,ज्ञानेश्वर सदगिर तसेच अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.