(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही , म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे , हीच गरज ओळखून मोफत आणि सक्तीचे शिक्षणाची सुरुवात करणारे, जातीय विषमतेच्या भिंती गाडून त्यावर पुरोगामी विचारांची इमारत भक्कमपणे उभी करणारे.
लोकराजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती म्हणजे शक्ती, बुद्धी आणि न्याय यांचा अभूतपूर्व संगम असलेला, २६ जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनातर्फे ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो.आज कर्जत नगरपरिषद कार्यालयात आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बांधकाम लेखनिक रविंद्र लाड, रिशिता शिंदे, दिलीप गायकवाड, छाया कुलकर्णी, जयेश घरत, विलास गायकवाड, शेखर लोहकरे, गोपाळ शेलार आदी उपस्थित होते.