राज्यभर अर्ध जल समाधी आंदोलन,आरक्षनासाठी धनगर समाज आक्रमक..

0
103

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून मल्हार सेना महाराष्ट्र यांच्या वतीने 22 अक्टोबर रोजी राज्यभर अर्ध जल समाधी आंदोलन करणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एसटी चे सर्टिफिकेट (धनगर आरक्षण) मिळावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने विविध संघटनाच्या वतीने रास्ता रोको, ढोल बजावो आंदोलन , मोर्चे आदीसह विविध मार्गाने आंदोलन करून सरकार कडे आरक्षण मिळावे यासाठी मागणी करत आहेत.

मात्र आता पुन्हा धनगर आरक्षनाचा प्रश्न पेटला असून मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर अर्ध जल समाधी आंदोलन करणार असल्याची माहिती मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी दिली आहे.