Sunday, December 8, 2024
Homeपुणेमावळराज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना 100 % प्रमाणे वेतन सुरु करणार...

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना 100 % प्रमाणे वेतन सुरु करणार …. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड..

मावळ : राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांच्या वेतनाची गंभीर समस्या असून, लवकरच 100% प्रमाणे वेतन देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
राज्य नगरपालिका व महानगर पालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिक्षण मंत्री गायकवाड यांनी मंगळवारी आयोजित केली होती.या वेळी त्यांनी आश्वासन दिले.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, जिल्हा परिषद शिक्षकां प्रमाणे नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकां साठी आंतर जिल्हा ऑनलाईन बदली पोर्टल सुरु करण्यात येईल. तसेच ज्या नगरपालिका व महानगरपालिकेने शिक्षकांना 7 वा वेतन आयोग अदयाप लागू केला नाही.त्यांना सूचना देण्यात येईल.

संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार सोहळ्यास लोणावळा येथे डिसेंबर महिन्यात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राज्य महिला सदस्या सविता बोरसे,नंदा तांदळे, सुचिता ऐखे, ज्योत्स्ना भरडा, राज्य उपाध्यक्ष अशोक शेंडगे, मुंबई उपाध्यक्ष, कृपेश म्हाते, गंगाधर कोळी, वैभव पाटील यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page