Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळाराज्यातील विकेंड लॉकडाऊन रद्द.. अत्यावश्यक सेवा दररोज 7 ते 11राहणार सुरु..

राज्यातील विकेंड लॉकडाऊन रद्द.. अत्यावश्यक सेवा दररोज 7 ते 11राहणार सुरु..

पुणे राज्यातील लॉकडाऊनच्या नियमावलिंसह शनिवार रविवार कडक लॉक डाऊन पाळण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे हे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली होती.सध्या रुग्णसंख्येत कमालीची घट होत असल्याने त्यासंदर्भात नुकतीच मंत्री मंडळाकडून बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीत राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आढावा घेत राज्यातील लॉक डाऊन मध्ये शिथिलता देण्यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी जिल्ह्यातील शनिवार रविवार चा कडक लॉक डाऊन रद्द केल्याचे आदेश शुक्रवारी उशिरा जारी केले आहेत.

त्या आदेशाचे सर्व जनता व व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. आदेशानुसार लॉक डाऊन कायम ठेवत विकेंड लॉक डाऊन रद्द करून अत्यावश्यक सेवेतील सर्व सुविधा सकाळी 7 ते 11 ह्या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page