राज्यात कडक लॉकडाऊन मुबंई पुणे एक्सप्रेसवे थांबला..

0
76


खालापूर (दत्तात्रय शेडगे)देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना राज्यात कोरोनाची दुसरी भयंकर लाट आली आहे यामुळे राज्य सरकारने 1 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे.

त्यामुळे मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूकही मंदावली असून अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता एक्सप्रेस वेवरची वाहतूक बंद आहे.राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असून त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

त्यामुळे मुबंई पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक पूर्णपणे बंद असून एक्सप्रेसवे अखेर थांबला आहे, कधीही न थांबणारा मुबंई पुणे एक्सप्रेसवे अखेर आज थांबल्याचे पहावयास मिळत आहे.