Monday, April 15, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य पोलीस दलातील 12500 जागा भरणास मंत्रीमंडळाची मंजुरी, पोलीस निवासस्थानाचा प्रश्न मार्गी...

राज्य पोलीस दलातील 12500 जागा भरणास मंत्रीमंडळाची मंजुरी, पोलीस निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावणार, गृहराज्यमंत्री..

पोलीस गृह निर्माणासाठी 800 कोटी रुपये राखीव, निवास स्थानाचा प्रश्न लवकरच सुटणार.. गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई.

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता पोलीस दलातील 12500 जागा भरणास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून रिक्त जागा व रोष्टरनुसार भरतीबाबत माहिती घेतली जात आहे आणि पुढील काही काळतच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

राज्यातील पोलीस दलात मनुष्यबळ अपुरे असल्याने पोलिसांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे लवकरच ही भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून रिक्त जागा, रोष्टरनुसार जागा व राखीव जागा यांची माहिती घेतली जात आहे या माहितीचे संकलन झाल्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया तातडीने सुरु केली.

जाईल त्याच बरोबर राज्यातील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न तसेच नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न ई. प्रश्न मार्गी लागणार आहेत. राज्याची कोविड मूळे खालावलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आल्यानंतर हे सर्व प्रश्न सोडविले जातील. पोलिसांच्या निवासस्थानाबाबत शासन संवेदनशील असून पोलीस गृहनिर्माणासाठी मागील वर्षी 350 कोटी रुपये राखीव ठेवले होते व या वर्षी ही रक्कम 800 कोटी करण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस भरती बरोबरच पुढील काळात पोलीस निवासस्थानाचा प्रश्नही सोडविला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page