Sunday, September 24, 2023
Homeपुणेलोणावळाराज्य शासनाच्या निर्बंधाला विरोध दर्शवीत शुक्रवारी लोणावळ्यातील बाजारपेठ ठेवणार सुरु....

राज्य शासनाच्या निर्बंधाला विरोध दर्शवीत शुक्रवारी लोणावळ्यातील बाजारपेठ ठेवणार सुरु….

लोणावळा दि.8: राज्य सरकार व प्रशासनाने दि.4/4/2021 व 5/4/2021 रोजी काढलेल्या आदेशाचा विरोध म्हणून लोणावळा शहरातील सर्व दुकाने शुक्रवार दि.9/4/2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठेवणार खुली. लोणावळा शहर व्यापारी संघटनेचा निर्णय.


राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाने नकळतपणे लॉक डाऊन प्रमाणे जे निर्बंध लागू केले आहेत त्याच्या विरोधात राज्यभरातील वेगवेगळ्या संघटनांकडून विरोध दर्शवीला जात आहे.

त्या आंदोलनास पाठिंबा व राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध दर्शवित लोणावळा शहर व्यापारी संघटनेकडून त्यांच्या कुटुंबियांकडून तसेच वेगवेगळ्या व्यवसायावर अवलंबून असलेले कारागीर व त्यांचे कुटुंबीय यांच्या वतीने शासनाच्या निर्णयाचा विरोध म्हणून शहरातील सर्व दुकाने शुक्रवारी 9 ते 6 पर्यंत सुरु ठेवणार आणि शासनाने जर व्यापारी वर्गाचा विचार नकरता दि.5 रोजी चा निर्णय बदलला नाही तर सर्व दुकाने नियमित सुरु ठेऊन राज्यात वेगवेगळ्या संघटनामार्फत सुरु असलेल्या शासनाच्या निर्बंधा च्या विरोधातील आंदोलनास पाठिंबा देणार असल्याचा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला आहे.

- Advertisment -