लोणावळा रात्रीच्या वेळी जवळ कोयता बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल….

0
1190
लोणावळा दि.10 : लोणावळा शहर पोलीस गस्त घालत असताना इंद्रायणी नगर येथील तरुण अजय दिलीप सावंत हा जवळ धारदार कोयता घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना मिळून आला.

काही दिवसांपूर्वी लोणावळा इंद्रायणी नगर येथील एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यातच काही दिवस उलटले असता हा तरुण इंद्रायणी नगरच्या हद्दीत जवळ कोयता घेऊन फिरत असताना रात्री गस्त घालत असलेल्या लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व गस्त पथकास मिळून आला.
बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी : अजय दिलीप सावंत ( वय 32, रा. इंद्रायणी नगर, लोणावळा ) याच्या विरोधात गु. र. नं.07/2021, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ. राजेंद्र मदने यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पो. ना. नितीन सूर्यवंशी करत आहेत.