रायगडात धनगर संघटनेने नोंदविला एकता कपूर चा निषेध, खालापूर पोलिसांना दिले निवेदन..

0
42

खोपोली- दत्तात्रय शेडगे

अभिनेत्री एकता कपूरने विर्गींन भास्कर या सेरीज मध्ये हॉस्टेल ला अहिल्याबाई होळकर छात्रालय असे नाव देऊन त्या सेरीज मध्ये अश्लीस दृष्य दाखवून अहिल्याबाई होळकर यांच्या नावाला कलंकित केल्याने अभिनेत्री एकता कपूर हिचा निषेध नोंदवत तिच्यावर कारवाई करावी या साठी रायगड जिल्हा हर हर चांगभले धनगर समाज संस्था खालापूर यांच्या वतीने खालापूर पोलीस स्टेशनला निवेदन दिले.

धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा वापर करून विर्गींन भास्कर सेरीज मध्ये अहिल्याबाई महिला छत्रालाय असे नाव देऊन छात्रवासात अश्लीस दृश्य दाखवून अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला कलंकित करण्याचे काम सदर टेलिफिल्म निर्माते एपिसोडकर्ते, व अभिनेत्री एकता कपूर यांनी केले आहे.

यासाठी महाराष्ट्रात धनगर समाज संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत अभिनेत्री एकता कपूर चा निषेध व्यक्त करत त्याच्या चित्रपटावर बंदी घालावी यासाठी रायगड जिल्हा हर हर चांगभले धनगर समाज संस्था खालापूर यांच्या वतीने खालापूर पोलिसांना निवेदन दिले आहे यावेळी हर हर चांगभले धनगर समाज संस्था खालापूर तालुका अध्यक्ष हरेश ढेबे, उपाध्यक्ष ठकुराम झोरे आदी उपस्थित होते.