भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
रायगड जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेच्या वतीने १ ऑगस्ट २०२१ रोजी अहमदनगर येथे होणाऱ्या पहिल्या सीनियर आणि मास्टर्स राज्यस्तरिय किक बॉक्सींग स्पर्धेसाठी रायगड जिल्हा किक बॉक्सिंग संघात ५५ खेळाडुंची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना उद्या होणाऱ्या स्पर्धेसाठी भरीव कामगिरी करता यावी व खेळाडूंनी राज्यात चमकावे , यासाठी रायगड जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राजिप चे उपाध्यक्ष व आरोग्य – शिक्षण – क्रीडा सभापती मा.सुधाकरशेट घारे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी भवन,दहिवली – कर्जत येथे नगर येथे स्पर्धेसाठी जाताना झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी उद्याच्या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सौरभ नवले,ऐश्वर्या सुळे, अंजली येवले, अपूर्वा ठोंबरे, आशा खरात, दक्षता उंबरकर, धनश्री जोशी, धृपदा जामधडे, हर्षदा शिंदे, जया शिंदे,रुपाली पेमारे, पुजा दांडेगावकर,प्रगती पाटील,
रसिका डुकरे,रोहीनी मोडक, शलाका देशमुख,सुमित्रा सावंत, वर्षा मते, विशाखा गंगावणे, योजना दिसले,आदेश जाधव, आकाश विरले,अमित बोसाख, अजदाबाबू अन्सारी, भावेश घरत, भुषण बडेकर, भूषण गायकवाड, जितेश मोलुसरे, कल्पेश दुर्गे ,कल्पेश पोतदार , मनोहर पारधी, मयूरेश बदे, नयन मते, निखिलेश बार्शी, निलेश पादिर, निशांत जोशी ,नितेश मसणे ,प्रथम गुरव ,प्रथमेश बदे, प्रतिक म्हसे, राज घरत,रोहन गुरव ,रोहीत तुपे,ऋषीकेश बदे, सचिन सानप,शेखर पार्टे, सिद्धार्थ चव्हाण,विनायक कदम, विरेंद्र देवरे,विशाल भगत,यश भोज,योगेश जाधव ,युवराज धुळे,या खेळाडूंचा समावेश आहे.
या राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ हा २६ ते २९ ऑगस्ट २०२१ दरम्यान गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा किक बॉक्सिंगचे अध्यक्ष तथा राजिपचे उपाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे तसेच अशोक भोपतराव , प्रशिक्षक जिवन ढाकवळ , मॅनेजर- संदिप आगीवले आदी उपस्थित होते .