रायगड जिल्ह्यात ०५ मजली इमारत कोसळली..

0
124


दि.२४/०८/२०२०

अष्ट दिशा वृत्तसेवा
रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये ०५ मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. महाड शहरातील काळजपुरा या भागात ही इमारत होती. या घटनेमुळे मोठी जीवित हानी झाल्याची शक्यता आहे. परंतु आत्तापर्यंत मृत किंवा जखमी व्यक्तींचा आकडा समोर आला नाही.


एन डी आर एफ च्या दोन टीम बचावकार्यासाठी रवाना झाल्याआहेत. इमारतीमध्ये ६० पेक्षा जास्त फ्लॅट आहेत.तारीक गार्डण असं कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे.७० ते ८० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे.