Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरायगड भूषण - किशोर गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश, डिकसळ नाक्यावर विद्युत रोषणाईचा...

रायगड भूषण – किशोर गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश, डिकसळ नाक्यावर विद्युत रोषणाईचा लखलखाट…

(कर्जत:प्रतिनिधि गुरुनाथ नेमाणे)
दि.5, कर्जत -कल्याण महामार्गावरील डिकसळ नाक्यावरील स्ट्रीट लाईट नसल्यामुळे येथील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या प्रयत्नाला रायगड भूषण किशोर गायकवाड यांच्या पाठपुराव्याने व अष्ट दिशा न्यूजने लावलेल्या बातमीच्या सहकार्याने यश आले आहे.
डिकसळ नाक्या वरील आयडीबीआय बँक ते ओमकार अपार्टमेंट पर्यंत रस्त्या वरील लाईटची मागणी करत असताना महिनाभर प्रतिक्षा करून आता कुठे तरी प्रशासनाला जागा आली आहे.यावेळी शांतीनगर येथील भारतीय संविधान स्तंभाजवळील नवीन स्ट्रीट एलईडी दिवे बसवून लाईट चालू करण्यात आली आहे.त्यामुळे डिकसळ नाक्यावरील परिसर उजळून निघाला आहे.
रस्त्यावरून लाईटची व्यवस्था झाल्यामुळे कामा वरून उशिरा अंधारातुन वाट काढत येणाऱ्या चाकरमान्यांची यामुळे मोठी सोय झाल्याने त्यांच्या कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.याठिकाणी चाकर मानी हे रात्री अपरात्री कर्जत कल्याण मार्गावरून डिकसळ नाक्यावरून आपल्या कामावरून घरी परतत असतात,सदर लाईट चालू करण्यात आली असताना रायगड भूषण किशोर गायकवाड यांच्या वतीने उमरोली ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.सध्या येथील संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी सर्वत्र प्रकाशमय वातावरण दिसत आहे. याठिकाणी स्ट्रीट लाईटच्या करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे परिसरातील नागरिकांच्यावतीने समाधान व्यक्त करत ग्रामपंचायत व अष्ट दिशा न्यूज यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page