रायगड मधील घोणसे घाटात बसचा अपघात ,3 मृत्यू तर 20 जन जखमी..

0
94

रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन खासगी बसचा भीषण अपघात झाला.

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पन्नास ते साठ फूट खोल दरीत बस कोसळली. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.काही गंभीर जखमींना माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
     
या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, नालासोपारा येथून ही खासगी बस सुटली होती. तिचा घोणसे घाटात आज सकाळी अपघात झाला. MH 04 FK 6616 असा या अपघात झालेल्या गाडीचा नंबर आहे. बस पुलावरुन खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून काहीजण श्रीवर्धन येथील गावी एका कार्यक्रमासाठी निघाले असताना बसचा अपघात झाला. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाण्याला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. सध्या मदतकार्य सुरु आहे. दरम्यान मृतांची ओळख पटवण्याबाबतचा तपास सुरु करण्यात आला आहे.