Thursday, September 28, 2023
Homeपुणेलोणावळाराष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग लोणावळा शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर....

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग लोणावळा शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर….

लोणावळा : शुक्रवारी संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात रा. कॉ. अल्पसंख्यांक विभाग लोणावळा शहर व तालुका नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणी नुसार लोणावळा शहर अध्यक्ष पदी हाजी सईद अहमद खान, उपाध्यक्ष अल्तमश तांबोळी तर जावेद शेख यांची लोणावळा शहर सरचिटणीस पदी तसेच मावळ तालुका कार्याध्यक्ष पदी अनवर शेख तर उपाध्यक्ष पदी ताजुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक मावळ तालुका अध्यक्ष आफतफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित कार्यकारी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप वगारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखरकारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, पशु संवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, युवक ग्रामीण अध्यक्ष कैलास गायकवाड, ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, लोणावळा शहर अध्यक्ष जिवन गायकवाड, सामाजिकन्याय विभाग अध्यक्ष विकी लोखंडे यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, नगरसेवक राजेंद्र कुडे, मा. उपसरपंच विशाल वहिले, नगरसेविका माया चव्हाण, पूनम जाधव, पूजा वहिले, सोमनाथ धोंगडे, संतोष देशमुख, सौरभ सावले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित कार्यकारी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
- Advertisment -