राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी बालाजी सलगर यांची निवड..

0
79


खोपोली- दत्तात्रय शेडगे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी युवा नेते बालाजी सलगर यांची नुकतीच निवड करण्यात आली.


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचे खंदे समर्थक माढा तालुक्यातील युवकांचा बुलंद आवाज, बालाजी सलगर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली.

त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना.दत्तामामा भरणे आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय साठे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.

बालाजी सलगर यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.